Tatkal Ticket Booking Tips: फक्त 1 काम करा आणि कन्फर्म ट्रेन तिकीट मिळण्याची शक्यता वाढवाकराच….

Tatkal Ticket Booking Tips
Tatkal Ticket Booking Tips

Tatkal ticket booking tips: तात्काळ ट्रेन तिकीट बुक करताना बहुतांश प्रवाशांचा एकच अनुभव असतो – सगळं नीट केलं तरी शेवटी Waiting List!…. ट्रेन आधीच निवडलेली असते, इंटरनेट वेगवान असतं, वेळेवर लॉगिन केलेलं असतं… पण तरीही काही सेकंदांत तिकीट संपून जातात. तात्काळ बुकिंग म्हणजे अक्षरशः काही सेकंदांची शर्यत असते. मात्र खरं सांगायचं झालं, तर थोडी स्मार्ट तयारी केली तर कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता नक्कीच वाढू शकते. यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि दुर्लक्षित पाऊल म्हणजे – Master List आधीच तयार ठेवणं.

टायपिंगमध्ये जातो मौल्यवान वेळ

Tatkal बुकिंग सुरू झाल्यावर प्रवाशाचं नाव, वय, लिंग, मोबाईल नंबर, आधार क्रमांक अशी माहिती टाइप करताना किमान 20 ते 30 सेकंद जातात.
तात्काळ बुकिंगमध्ये हे काही सेकंद म्हणजे सोन्यासारखे मौल्यवान असतात. याच वेळेत अनेकदा सर्व तिकीटं संपतात.

कधी कीबोर्ड स्लो होतो, कधी स्क्रीन अडकते, तर कधी इंटरनेटचा स्पीड अचानक कमी होतो. यामुळे शेवटी हातात येते ती फक्त Waiting List.

Master List म्हणजे काय आणि ती कशी मदत करते?

IRCTC च्या Master List मध्ये तुम्ही प्रवाशांची माहिती आधीच सेव्ह करून ठेवू शकता.
एकदा ही माहिती सेव्ह केली की तिकीट बुक करताना पुन्हा काहीही टाइप करायची गरज राहत नाही.

Master List कशी तयार कराल?

  1. IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅप उघडून लॉगिन करा
  2. My Account → My Profile मध्ये जा
  3. Add/Modify Master List या पर्यायावर क्लिक करा
  4. प्रवाशाचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, आधार क्रमांक अशी माहिती अचूक भरा
  5. आधार पडताळणी पूर्ण झाल्यावर माहिती सेव्ह करा

आता पुढच्या वेळी तिकीट बुक करताना फक्त ड्रॉप-डाऊनमधून प्रवाशाचं नाव निवडा आणि थेट पुढील स्टेपकडे जा.
यामुळे वेळ वाचतो आणि बुकिंग फास्ट होते.

पेमेंटही ठरवते तिकीट कन्फर्म होणार की नाही

तिकीट उपलब्ध असतानाही पेमेंटवेळी अडचण आली तर बुकिंग फेल होऊ शकतं.
UPI अडकणं, बँक सर्व्हर स्लो होणं किंवा OTP उशिरा येणं – यामुळे अनेकदा तिकीट हातातून जातं.

👉 यासाठी शक्य असल्यास:

  • IRCTC Wallet मध्ये आधीच ₹500–₹2000 रिचार्ज ठेवा
  • किंवा Instant UPI / QR Payment वापरा

यामुळे बुकिंग फेल होण्याचा धोका कमी होतो.

शेवटी एवढंच…

कधी घरी पोहोचायची घाई असते, कधी एखाद्या कार्यक्रमासाठी प्रवास करायचा असतो, तर कधी आपल्याला कुणासाठी तात्काळ धाव घ्यावी लागते. अशा वेळी Waiting List दिसणं मन खचवणारं ठरतं. म्हणून पुढच्या वेळी Tatkal ट्रेन तिकीट बुक करण्याआधी एकच गोष्ट लक्षात ठेवा –Master List आधीच तयार ठेवा. हे छोटंसं पाऊल तुम्हाला कन्फर्म तिकीटाच्या अधिक जवळ नेऊ शकतं.

Sharing Is Caring:

Leave a Comment