
PAN Card Aadhaar Link Online | आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड हे केवळ कर भरण्यासाठीच नाही, तर बँक खाते, गुंतवणूक, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, केवायसी आणि अनेक आर्थिक व्यवहारांसाठी अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. त्याचप्रमाणे आधार कार्ड हे सरकारी तसेच वैयक्तिक कामांसाठी ओळखीचा प्रमुख पुरावा आहे. त्यामुळे सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.
31 डिसेंबर 2025 अंतिम मुदत – अन्यथा पॅन निष्क्रिय होणार ?
जर तुमचा पॅन अद्याप आधारशी जोडलेला नसेल, तर आता विलंब करणे धोकादायक ठरू शकते. सरकारी सूचनेनुसार 31 डिसेंबर 2025 ही पॅन–आधार लिंक करण्याची अंतिम तारीख आहे. या मुदतीपर्यंत लिंक न झाल्यास 1 जानेवारी 2026 पासून पॅन निष्क्रिय (Inactive) होऊ शकतो. अशा स्थितीत आर्थिक व्यवहार, कर भरणे व केवायसीसारखी कामे अडचणीत येऊ शकतात. (PAN Aadhaar Link Status Online Check)
कोणासाठी पॅन–आधार लिंक बंधनकारक?
Income Tax Departmentनुसार, 1 जुलै 2017 रोजी किंवा त्यापूर्वी जारी करण्यात आलेल्या पॅन कार्डसाठी आधार लिंक करणे बंधनकारक आहे. ही सुविधा सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी उपलब्ध आहे, ते ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असोत किंवा नसोत. नवीन पॅन कार्डसाठी आधार-आधारित पडताळणी आधीच आवश्यक करण्यात आली आहे. (PAN Aadhaar Link)
पॅन–आधार लिंक करण्याची सोपी पद्धत…
- इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या
- लॉग-इन करून Profile / Aadhaar Linking या पर्यायावर क्लिक करा
- पॅन व आधार क्रमांक भरा
- आवश्यक असल्यास e-Pay Tax द्वारे निर्धारित शुल्क भरा
- शुल्क भरल्यानंतर पुन्हा पोर्टलवर जाऊन लिंक प्रक्रिया पूर्ण करा
हे देखील वाचा….
Ration Card eKYC Online | रेशन कार्ड e-KYC करा, नाहीतर धान्य मिळणे होऊ शकते बंद…
पॅन–आधार लिंक स्टेटस कसे तपासावे?
जर तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे माहित नसेल, तर खालीलप्रमाणे स्टेटस तपासता येतो:
- इन्कम टॅक्स पोर्टलवरील Link Aadhaar Status या पर्यायावर जा
- पॅन आणि आधार क्रमांक टाका
- सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर स्टेटस दिसेल
तुम्हाला खालीलपैकी एक संदेश दिसू शकतो:
- Aadhaar linked (आधार लिंक आहे)
- Aadhaar not linked (आधार लिंक नाही)
- Linking in progress (प्रक्रिया सुरू आहे)
माहिती जुळत नसेल तर काय करावे?
अनेक वेळा नाव, जन्मतारीख किंवा लिंगातील फरक असल्यामुळे लिंक करण्यात अडथळा येतो. अशावेळी:
- आधारमधील माहिती दुरुस्तीसाठी UIDAIच्या संकेतस्थळावर अर्ज करा
- पॅनमधील तपशील दुरुस्तीसाठी Protean eGov Technologies किंवा UTIITSL यांच्या वेबसाइटचा वापर करा
- समस्या कायम असल्यास जवळच्या पॅन सेवा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी करून घेता येते