
Maharashtra Weather Forecast today : सध्या राज्यात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तसेच पावसालाही उधाण येत आहे. राज्यात २८ ऑगस्टला सर्वदूर पाऊस पडल्यानंतर आज २९ ऑगस्ट रोजीही बहुतांश भागात पावसाने व्यापला जाणार असल्याची शक्यता आहे. कोकण व गोव्यात पुढील पाच ते सात दिवस तर विदर्भा मध्ये पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
‘या’ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार!
सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूरच्या घाट विभागात तुरळक स्वरूपात पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात दोन दिवस पाऊस, येलो अलर्ट घोषित
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवस तुरळ ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.
राज्यातील उर्वरित भागात कसा असेल पाऊस?
राज्यातील उर्वरित भागामध्ये पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून उर्वरित भागात दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट विभागात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या विभागासाठी 30 तारखे पासून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात असा राहील पाऊस
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभाग विभागात पुढील दोन दिवस तुलना ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे घाट विभागासाठी दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या ३० ऑगस्ट रोजी कसे असेल महाराष्ट्रातील हवामान?
कोकणातील स्थिती : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा: मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो.
मध्य महाराष्ट्रातील स्थिती : मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.
विदर्भातील स्थिती : विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे असे पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे.