Land area calculator app download: झटपट जमिनीची मोजणी करायचीये? या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने काम होईल काही मिनिटांतच!

Land area calculator app download: आपली जमीन म्हणजे जणू आपल्या घामाचा, मेहनतीचा, आणि अनेक आठवणींचा हा एक वारसाच असतो. शेतजमीन असो, किंवा शहरातली विकासकामासाठी असलेली मालमत्ता असो, तिची योग्य मोजणी होणं हे फारच गरजेचं आहे. कारण एकदा जमीन चुकीच्या पद्धतीने मोजली गेली, की मग त्यापुढचं सगळं गणितच बिघडून जातं. आणि जर कोणी त्या जमिनीवर अतिक्रमण केलं, तर मग त्यासाठीची लढाई वर्षानुवर्षं कोर्टात रेंगाळू शकते. अशा वेळी, जर काही मिनिटांत तुम्ही स्वतः आपल्या मोबाईलवरून जमिनीची अचूक मोजणी करू शकलात, तर? होय, हे आता शक्य आहे, ते देखील एका स्मार्ट अ‍ॅपच्या माध्यमातून.

मोबाईलमधून करा जमिनीची मोजणी

सध्या जो मोबाईल आपल्या हातात आहे, त्याचा उपयोग आपण फक्त सोशल मीडियापुरताच मर्यादित ठेवला आहे. पण याच मोबाईलचा वापर करून तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी अगदी काही मिनिटांत करू शकणार आहात. तर सध्या प्ले स्टोअर वर GPS Area Calculator म्हणून एक अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, जे तुमच्या जमीन मोजणीचं काम कुठल्याही खर्चाशिवाय अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण करून देतं.

हे अ‍ॅप कसं वापरायचं?

  • तर हे ॲप वापरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये Play Store उघडा. त्यानंतर त्यात Google Map Area Calculator किंवा GPS Area Calculator असं सर्च करा.
  • पुढे मिळालेल्या यादीतून योग्य अ‍ॅप निवडा आणि ते मोबाईल मधे डाउनलोड करून Install करा.
  • हे अ‍ॅप पूर्णपणे इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलच GPS ऑन करायचं आहे, जेणेकरून ॲपला तुमचं लोकेशन अगदी अचूक समजेल.
  • आता हे अ‍ॅप ओपन करा, तिथे तुम्हाला तुमचा संपूर्ण परिसर नकाशावर बघायला मिळेल.
  • या ठिकाणी राज्य, जिल्हा, तालुका भरून हवं असलेलं ठिकाण शोधा.
  • त्यानंतर जमिनीच्या चारी कोपऱ्यांवर क्लिक करून सीमा निश्चित करा.
  • आणि पुढे स्क्वेअर फूट किंवा स्क्वेअर मीटर अशा मापन पद्धती निवडा.
  • काही सेकंदातच तुमच्या जमिनीच माप तुमच्यासमोर असेल.

भारतात अशा अ‍ॅप्सची गरज का भासते?

आपल्याला माहितच आहे की, भारतात जमिनीचे वाद काही नवीन नाहीत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये, जिथे जमिनीच्या हिश्श्यांवरून भाऊबंदकीमधे भांडणं सुरू होतात. कधी वडिलोपार्जित जमिनीची नोंद नसल्यामुळे अडचण होते, तर कधी शासकीय मोजणीसाठी कितीतरी महिने वाट पाहावी लागते. अशा वेळी, स्वतःच्या मोबाईलवरून मोजणी केल्याने अनेक वादांचे निराकरण लगेचच होण्यास मदत होऊ शकते.

जमीन मोजणीची मोजमाप पद्धत लक्षात ठेवा

  • 1 एकर = 40 गुंठे
  • 1 गुंठा = 1089 चौरस फूट
  • 1 एकर = 43560 चौरस फूट
  • 1 हेक्टर = 107636 चौरस फूट

ही मोजणी पद्धती लक्षात ठेवली, की तुम्हाला कोणत्याही जमिनीविषयी कधीही आणि कुठेही समजून घेणं सोपं जाईल. तर मग आजच GPS Area Calculator अ‍ॅप डाउनलोड करा, आणि स्वतःच आपल्या जमिनीची सगळी माहिती ठेवा.

Sharing Is Caring:

Leave a Comment