
Digital 7/12 Maharashtra | महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना सातबारा उतारा घेण्यासाठी वर्षानुवर्षे भोगावा लागणारा त्रास अखेर संपणार आहे. सातबारा मिळवताना तलाठी कार्यालयात जाणं, रांगेत उभं राहणं, सही-शिक्क्यासाठी विनंती करत फिरणं या सर्व प्रक्रियेत मोठा बदल करत महसूल विभागाने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे संपूर्ण महाराष्ट्रात कायदेशीर वैध ठरणार आहेत. Maharashtra Satbara Online
या निर्णयामुळे तलाठ्याच्या सही किंवा शिक्क्याशिवायही डिजिटल सातबारा सर्व व्यवहारांसाठी स्वीकारला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना आता फक्त 15 रुपयांत हा उतारा महाभूमी पोर्टलवरून थेट डाउनलोड करता येईल. यात डिजिटल स्वाक्षरी, QR कोड आणि 16 अंकी व्हेरिफिकेशन नंबर असल्याने कोणत्याही शासकीय कार्यालयात त्याची सत्यता लगेच तपासता येणार आहे. Digital 7/12 Download
पूर्वी सातबारा मिळवण्यासाठी अनेकांना तलाठी कार्यालयात अनेक वेळा जावं लागत होतं. नोंद उशिरा झाल्याने कर्जाचे प्रस्ताव अडकणे, जमीन व्यवहार थांबणे, किंवा अधिकृत उताऱ्यासाठी अनावश्यक त्रास सहन करावा लागत असे. आता डिजिटल उताऱ्यामुळे ही सर्व धावपळ संपणार आहे. महसूल विभागाने केलेली ही सुधारणा म्हणजे जमीन अभिलेख व्यवस्थापनातील एक मोठी डिजिटल क्रांती आहे. Digital Satbara Maharashtra
डिजिटल सातबारा मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे:
- digitalsatbara.mahabhumi.gov.in या अधिकृत सरकारी पोर्टलला भेट द्या
- गट क्रमांक, खाते क्रमांक किंवा मालमत्तेची इतर माहिती भरा
- ऑनलाइन पेमेंट (₹15) करा
- आणि लगेच डिजिटल 7/12 डाउनलोड करा
ग्रामीण भागातील नागरिकांनाही हा उतारा आता थेट मोबाईलवरून सहज मिळू शकतो, त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते.
डिजिटल सातबारा खालील सर्व कामांसाठी तितकाच वैध आहे:
- जमीन खरेदी-विक्री
- बँक कर्ज
- वारसा नोंदणी
- न्यायालयीन कामकाज
- जमीनशी संबंधित सर्व शासकीय प्रक्रिया
हा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि नोंदवही नियम 1971 यांच्या आधारे लागू असून त्यामुळे डिजिटल उताऱ्याची कायदेशीर ताकद पूर्णपणे पक्की आहे. Mahabhumi Digital 7/12 या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील जमीन अभिलेख व्यवस्था आता प्रत्यक्षात डिजिटल युगात प्रवेश करत आहे. फक्त सुविधा नव्हे, तर वेग, पारदर्शकता आणि विश्वास वाढवणारा हा बदल शेतकरी आणि नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. Digital 7/12 Maharashtra