
Free invitation cards making in marathi भारत हा संस्कृती आणि परंपरा जपणारा देश आहे. आपल्याकडे प्रत्येक धर्मात विविध सणवार तसेच धार्मिक कार्यक्रम असतातच. वाढदिवस सोहळा, लग्न सोहळा किंवा नामकरण विधी तर असतोच असतो. मग अशा वेळी पाहुण्यांना निमंत्रण देणे करीता निमंत्रण पत्रिका तयार करावी लागते. बाहेर जर एखाद्या डिझायनर कडे गेल्यास अशा डिजिटल निमंत्रण पत्रिका तयार करण्यासाठी आपल्याला भरपूर पैसे खर्च करावे लागतात. म्हणूनच आम्ही तुमच्या सोयीसाठी काही ऍप्स व वेबसाईट्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी मोफत व सहजरीत्या मराठी निमंत्रण पत्रिका बनवू शकाल, चला तर मग पाहूया ते कोण कोणते ऍप व वेबसाईट्स आहेत.
कोण-कोणत्या कार्यक्रमां साठी निमंत्रण पत्रिका आपल्याला बनवाव्या लागतात
संपूर्ण वर्ष भर आपल्या कौटुंबिक आणि सार्वजनिक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. मग हे कार्यक्रम लग्ना पासून ते सार्वजनिक गणेशोत्सवा पर्यंत सगळेच असतात. या कार्यक्रमांना पाहुण्यांना निमंत्रित करण्या साठी आपण निमंत्रण पत्रिका छापून घेतो. या निमंत्रण पत्रिका विविध प्रकारच्या असू शकतात
- लग्नपत्रिका
- साखरपुडा निमंत्रण
- हळदिचे निमंत्रण
- वास्तुशांती निमंत्रण
- गृहप्रवेश निमंत्रण
- मुलाचे जावळ
- नवशिशूचा नामकरण विधी
- ओटभरणी निमंत्रण
- सत्यनारायणाची पुजा
डिजिटल निमंत्रण पत्रिकांचा जमाना
सध्या कागदी निमंत्रण पत्रिका खूप कमी छापल्या जात असून त्या मागे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये हे एक महत्वाचे कारण असतेच. मात्र डिजिटल स्वरुपात निमंत्रण पत्रिका जास्त प्रमाणात पाठवल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे या डिजिटल निमंत्रण पत्रिका पाहुण्यांना पाठवणे हे अत्यंत सोपे असते आणि ते बनवण्याची पद्धत-देखील अगदीच सोपी असते. तसेच आपल्या नातेवाईकांना व्हॉट्सॅप, ईमेल आणि टेलिग्रामच्या माध्यमातून या निमंत्रण पत्रिका अगदी सहजरीत्या पाठवतात येतात. Free invitation cards making in marathi
मोफत बनवा निमंत्रण पत्रिका
घरातील विविध समारंभ व सोहळ्या साठी लागणा-या निमंत्रण पत्रिका तुम्ही अगदी मोफत बनवू शकता. पुढे देण्यात आलेल्या वेबसाईटद्वारे मोफत किंवा पैसे पे करुन निमंत्रण पत्रिका बनविण्या साठी सर्वात प्रथम तुम्हाला त्या वेबासईट वर लॉगीन करावे लागणार आहेत. तुमचा इ-मेल आयडी आणि मोबाईल नंबरच्या मदतीने तुम्ही हे लॉगीन करु शकता.
कॅन्वा – Canva

https://www.canva.com/ या लिंक वर क्लिक करुन तुम्ही Canva या डिझायनिंग वेबसाईट वर जाऊ शकता. या वेबसाईट-वर तुम्ही तुमच्या घरा-तील विविध कार्यक्रमांच्या निमंत्रण-पत्रिका बनवू शकता. तसेच उत्तम प्रकारचे सोशल ग्राफिक्स देखील बनवू शकता. काही निमंत्रण पत्रिकांचे आऊट-लेट हे मोफत असून काहीं साठी ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत. तुम्ही अश्या निमंत्रण पत्रिकेचा नमुना निवडा जो फ्री आहे जेणेकरून त्या साठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत. Free invitation cards making in marathi
मराठी इन्विटेशन कार्ड्स

https://play.google.com/store/apps/details?id=com.urva.allinvitationcards या लिंक वर तुम्हाला लग्नापासून ते जावळ, मुंज आणि सत्यनारायण महापूजा या सर्व घरगुती सोहळ्यां साठी मराठी पद्धतीच्या निमंत्रण पत्रिका बनवता येणार आहेत. अत्यंत सोप्या आणि सहज पद्धतीने त्यांनी वेबसाईट वर दिलेले निमंत्रण पत्रिकांचे नमुने तुम्ही एडिट करु शकणार आहात. आणि ते एडिट करुन तुमची माहिती त्या मध्ये भरुन तुमची स्वतः ची अशी निमंत्रण पत्रिका तयार करता येणार आहे. Free invitation cards making in marathi
ग्रिटिंग इस्लॅँड – Greetings Island
https://www.greetingsisland.com/ या लिंक वर क्लिक करून तुम्ही Greetings Island या वेबसाईट ला भेट देऊ शकता. यावर तुम्ही तुम्हाला हव्या त्या कार्यक्रमा ची निमंत्रण-पत्रिका तयार करु शकता. साखरपुडा, रिसेप्शन, लग्न अशा एक नाही तर अनेक कार्यक्रमांच्या निमंत्रण-पत्रिकांचे नमुने येथे देण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करुन तुम्ही तुम्हाला हव्या तशा निमंत्रण-पत्रिका बनवू शकता. येथे पैसे देऊन सुद्धा छान नमुने निवडता येतील आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने तुमची स्वतःची अशी निमंत्रण पत्रिका तयार करता येईल अशी सोय करण्यात आली आहे.
पेपरलेस पोस्ट – Paperless Post

https://www.paperlesspost.com/ या लिंक वर क्लिक करुन तुम्ही पेपर-लेस पोस्ट या वेबसाईटला भेट दऊ शकता. इतर सर्व वेबसाईट प्रमाणेच या वेबसाईट वर देखील तुम्ही सुंदर स्वरुपात निमंत्रण पत्रिका बनवू शकता त्यादेखील अगदी मोफत. परंतु काही सर्वोत्तम डिझाईन्स साठी मात्र वेबसाईट वर ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत. मोफत निमंत्रण-पत्रिका बनविण्या साठी अनेक ऍप उपलब्ध आहेत. परंतु आपल्या काही मित्रांना किंवा नातेवाईकांना त्याची माहितीच नसते. परंतु आता या लेखाच्या माध्यमा-तून तुम्ही तुमच्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे पैसे वाचवू देखील शकता आणि त्यांना मोफत निमंत्रण-पत्रिका बनवण्या साठी मार्गदर्शन करु शकता. अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्या साठी आमच्या वेबसाईटला परत नक्की भेट द्या. Free invitation cards making in marathi