
Call recording app: आपण एखाद्याशी फोनवर काही महत्वाचं बोलत असतो तेव्हा त्या बोलण्याचा काही भाग हा भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला उपयोगी पडणारा असतो. मग तो वैयक्तिक कारणांसाठी असो किंवा व्यावसायिक कामासाठी, अनेक वेळा त्या संभाषणाची नोंद सेव्ह करून ठेवणे गरजेचे असते. आणि हेच लक्षात घेऊन अनेकजण कॉल रेकॉर्डिंग ॲपचा वापर करतात.
पूर्वी अनेक मोबाईल ब्रँड्सनी आपापल्या फोन्समध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंगची सोय दिली होती. मात्र, काही गोष्टी लक्षात घेऊन गुगलने थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी घातली आणि मोबाईलमधून सुद्धा ही सुविधा काढून टाकण्यात आली. त्यामुळे आता वापरकर्त्यांना कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी प्ले स्टोअरमधून स्वतंत्र ॲप डाऊनलोड करावे लागते. या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की, कॉल रेकॉर्डिंग ॲप कसे डाऊनलोड करावे, त्याचे फायदे काय आहेत आणि गुगलने अशा ॲप्सवर बंदी का घातली.
कॉल रेकॉर्डिंग ॲप डाऊनलोड करण्याची पद्धत
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील Play Store उघडा.
- सर्च बॉक्समध्ये “Call Recording” असं टाईप करा.
- तुम्हाला समोर अनेक ॲप्सची यादी दिसेल. त्यामध्ये कमीतकमी 4 स्टार रेटिंग असलेलं आणि चांगले रिव्ह्यूज असलेलं ॲप निवडा.
- ते ॲप डाऊनलोड करून मोबाईलमध्ये इंस्टॉल करा.
- ॲप सुरू करताना ते काही परमिशन्स मागेल, उदा. Contacts, Microphone, Storage, इ. या सर्व परवानग्या द्या.
- परमिशन दिल्यावर ॲप पूर्णपणे चालू होईल आणि तुम्ही लगेचच कॉल रेकॉर्ड करू शकता.
कॉल रेकॉर्डिंगचे काही महत्त्वाचे फायदे
कधी कधी एखाद्या संभाषणाचा भाग न्यायालयात पुराव्याच्या स्वरूपात सादर करावा लागतो. कॉल रेकॉर्डिंगमुळे तुम्ही ते संभाषण सेव्ह करून ठेवू शकता.
एखाद्या अभ्यासक्रमासाठी किंवा संशोधनासाठी व्यक्तींच्या मुलाखती घेणे आवश्यक असते. अशावेळी कॉल रेकॉर्डिंगमुळे तुमचं झालेलं बोलणं सेव्ह करता येतं.
वर्क फ्रॉम होम वाढल्यामुळे अनेक वेळा फोनवरून घेतलेली माहिती विसरली जाते. बॉसने दिलेली सूचना, क्लायंटची माहिती, यासारख्या गोष्टी कॉल रेकॉर्डिंगद्वारे व्यवस्थित सेव्ह करता येतात आणि त्या नंतर कामात उपयोगी पडतात.
काही लोकप्रिय कॉल रेकॉर्डिंग ॲप्स
- Call Recorder – Cube ACR
- Automatic Call Recorder Pro
- Easy Voice Recorder
- Super Call Recorder
- RMC Android Call Recorder
- Call Recorder – CallsBox
- Call Recorder – Lovekara
- Call Recorder – CallX
- HD Auto Call Recorder 2022
- Call Recorder Automatic
गुगलने कॉल रेकॉर्डिंग ॲपवर बंदी का घातली?
कॉल रेकॉर्डिंग ही प्रायव्हेट गोष्ट असते. त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता (Privacy) जपण्यासाठी गुगलने थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी घातली. याआधी अनेक मोबाईल्समध्ये कॉल रेकॉर्डिंगचा इनबिल्ट पर्याय होता, पण कालांतराने या पद्धतीला देखील मर्यादा आल्या. आता कॉल रेकॉर्ड करण्यापूर्वी फोनवर एक ऑडिओ नोटिफिकेशन वाजते, “This call is now being recorded.” त्यामुळे दोन्ही व्यक्तींना समजते की कॉल रेकॉर्ड होत आहे.