Voter List PDF Maharashtra | मतदार यादी ऑनलाइन डाउनलोड करण्याची सोपी आणि जलद प्रक्रिया

मतदार यादी PDF स्वरूपात डाउनलोड करणे आता खूप सोपं झालं आहे. खाली दिलेल्या चरणांनुसार तुम्ही महाराष्ट्रातील कोणतेही गाव किंवा वॉर्डची मतदार यादी काही क्षणांत मिळवू शकता. (Voter List PDF Maharashtra)

स्टेप 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर ब्राउझर उघडा आणि अधिकृत निवडणूक आयोगाची वेबसाइट उघडा:
👉 https://voters.eci.gov.in

वेबसाईट उघडल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि Services या विभागात दिसणाऱ्या Download Electoral Roll या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 2: आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करा

त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म दिसेल. त्यामध्ये पुढील माहिती नीट निवडा:

  • State (राज्य): Maharashtra
  • District (जिल्हा): तुमचा जिल्हा
  • Assembly Constituency (विधानसभा क्षेत्र): तुमचे क्षेत्र
  • Language (भाषा): मराठी
  • Roll Type: Final Roll (अंतिम यादी)

शेवटी दिलेला Captcha कोड भरून पुढे जा.

स्टेप 3: गावांची/वॉर्डची यादी पाहा

फॉर्म सबमिट केल्यानंतर खाली स्क्रोल करा. येथे तुमच्या निवडलेल्या विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांची किंवा वॉर्डची यादी दिसेल.

स्टेप 4: तुमचं गाव शोधा

एका पानावर साधारण 10 गावांची नावे प्रदर्शित होतात.
जर तुमचं गाव पहिल्या पानावर नसेल तर पुढील यादी पाहण्यासाठी “>” (Next) बटणावर क्लिक करा.

स्टेप 5: गाव निवडा आणि PDF डाउनलोड करा

तुमच्या गावाच्या नावासमोर असलेल्या चेकबॉक्समध्ये ✔ (टिक) करा.
नंतर वर दिसणाऱ्या Download Selected PDFs या बटणावर क्लिक करा.

स्टेप 6: PDF यादी डाउनलोड किंवा उघडेल

काही सेकंदांत तुमच्या गावाची संपूर्ण मतदार यादी PDF स्वरूपात डाउनलोड होईल किंवा थेट उघडेल.

या PDF मध्ये तुम्हाला पुढील माहिती दिसेल:

  • मतदाराचे पूर्ण नाव
  • घर क्रमांक किंवा पत्ता
  • मतदान केंद्राचा पत्ता
  • गाव/वॉर्ड क्रमांकाची माहिती
Sharing Is Caring:

1 thought on “Voter List PDF Maharashtra | मतदार यादी ऑनलाइन डाउनलोड करण्याची सोपी आणि जलद प्रक्रिया”

Leave a Comment